बॉलिवूड कलाकारांच्या वाट्याला आलेल्या यशामध्ये अनेक जणांचा हात असतो. त्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते म्हणजे बालपणीच्या गुरुंचे. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देतात त्याचप्रमाणे बालपणातच विविध प्रकारच्या विद्यांचे प्रशिक्षण देत कोणाचेही गुरु त्यांच्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या मनातही तिच्या गुरुंबद्दलअसेच आदराचे स्थान आहे. ऐश्वर्या राय बच्चन ही एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनय आणि सौंदर्यासोबतच नृत्यकौशल्यासाठीही ओळखली जाते. ऐश्वर्याच्या या सुरेख नृत्यशैलीमागे हात आहे तो म्हणजे तिच्या गुरु लता सुरेंद्र यांचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणापासूनच ऐश्वर्यामध्ये दडलेल्या सुप्त गुणांना पैलू पाडण्यामध्ये तिच्या या गुरुंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एका कार्यक्रमामध्ये ऐश्वर्या गेली असता तिथे तिच्या नृत्य गुरुंनी म्हणजेच लता सुरेंद्र यांनी ऐश्वर्यासाठी एक नृत्याविष्कार सादर केला. त्यावेळी आपल्या गुरुंना पाहून ऐश्वर्या फार भावूक झाली आणि तिने अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. आजवरच्या कारकिर्दीमध्ये ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयाप्रमाणेच नृत्यालाही महत्त्व दिले आहे. दरम्यान, ऐश्वर्याने पहिल्या ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ डान्स’ च्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळीच ऐश्वर्याला तिच्या गुरुंनी ही खास भेट दिली.

आपल्या गुरुंना समोर असे नृत्य करताना पाहून भावूक झालेली ऐश्वर्या म्हणाली, ‘मी इयत्ता दुसरीत असल्यापासून यांच्याकडून नृत्याची तालीम घेत आहे. नृत्याला माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक बनवण्यामध्ये माझ्या गुरुंची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आयुष्यात याच्यापेक्षा कोणताही असा मोठा क्षण नाही की, तुम्ही तुमच्या गुरुला तुमच्यासाठी नृत्य करताना पाहताय’. या कार्यक्रमामध्ये भावूक झालेल्या ऐश्वर्याने व्यासपीठावर जात तिच्या गुरुंचे पाय धरुन आशिर्वादही घेतला. अॅश आणि तिच्या गुरुंच्या या गळाभेटीनंतर तेथील वातावरणही भावूक झाले होते असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमामध्ये लता सुरेंद्र यांनी ऐश्वर्याकडे आराध्यालाही नृत्याचे शिक्षण मिळाले असा आग्रहसुद्धा केला.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan got teary eyed watching her dance guru perform
First published on: 08-12-2016 at 16:46 IST