ऐश्वर्या राय बच्चन ही ‘विश्वसुंदरी’ म्हणून ओळखली जाते. तिच्या रुपाची मोहिनी अनेकांना भुरळ पाडते. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत ऐश्वर्याचं नाव आघाडीवर आहे. सुंदर आणि बुद्धिमान स्त्री अशा शब्दात काही आघाडीच्या मासिकांनी तिचं कौतुक केलं आहे. मात्र अधिक सुंदर दिसण्यासाठी तिनं काही वर्षांपूर्वी प्लास्टिक सर्जरीदेखील केली अशाही चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. या चर्चांवर ऐश्वर्यानं ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेसो’ चॅट शोमध्ये मौनं सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केलेली ऐश्वर्याही काही पहिलीच अभिनेत्री नाही. याआधी प्रियांका, दीपिका पासून अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. मात्र या विषयावर उघडपणे बोलणं सगळ्यांनी टाळलं. पण ऐश्वर्या मात्र याहून वेगळी ठरली. या चॅट शोमध्ये प्लॉस्टिक सर्जरीचा तू कधी विचार केला होता का असा प्रश्न तिला विचारण्यात आला, यावर मोठ्या खुबीनं तिनं उत्तर दिलं. ‘प्रत्येकाला देवानं काहीतरी भरभरून दिलं असतं, पण तरी काय करावं आणि काय नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि तसंही काही गोष्टी लपून राहत नसतात. अमुक एक गोष्ट बरोबर आणि अमुक एक चुकीची असा सल्ला कोणालाही देणं चुकीचं आहे. त्यामुळे जर एखाद्याला प्लास्टिक सर्जरी करायचीच असेल तर त्याची योग्य माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. असं ती म्हणाली.

नुकताच ऐश्वर्याचा ‘फन्ने खान’ चित्रपट प्रदर्शित झाला. अनिल कपूर, राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवण्यास अपयशी ठरला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan on plastic surgery
First published on: 16-08-2018 at 10:18 IST