‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित व्हायला आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. खुद्द ऐश्वर्या राय- बच्चनही आता या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. ‘द कपिल शर्मा शोमध्ये नुकतीच ‘ऐ दिल है.. ‘ची संपूर्ण टीम गेली होती. अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर या कार्यक्रमामध्ये दिसले होते.
या कार्यक्रमात विनोदवीर कपिलने ऐश्वर्याच्या सौदर्याचे कौतुक केले. तिच्या सौंदर्याचे कौतुक केल्यानंतर कपिलने ऐश्वर्याला ‘तुला सर्वाधिक हॅण्डसम पुरुष कोण वाटतो,’ असा प्रश्न केला. कपिल शर्माच्या या प्रश्नावर ऐश्वर्या कोणाचे नाव घेणार याबाबत प्रक्षेकांसह तिच्या सहकारी कलाकारांनी देखील आपला श्वास रोखून धरला होता. या प्रश्नावर ऐश्वर्यानेच कपिलचीच फिरकी घेतली. ‘माझे आता लग्न झाले आहे. ज्याला मी आयुष्याचा जोडीदार बनवला आहे तोच माझ्यासाठी सर्वात हॅण्डसम पुरुष आहे.’ असे सांगत ऐशने अभिषेक बच्चनचे नाव घेतले. यापूर्वी देखील ऐश्वर्याने सरबजीतच्या प्रमोशनवेळी कपिलच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.
दरम्यान करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही एक महत्त्वाची भूमिका साकारत असल्यामुळे या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून याच दिवशी अजय देवगणचा बहुचर्चित ‘शिवाय’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नेमकी कोणता चित्रपट आवडणार हे तर येणारा काळच सांगू शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2016 रोजी प्रकाशित
कपिलच्या ‘मुश्किल’ सवालावर ऐश्वर्याने असे दिले प्रत्त्युत्तर
'द कपिल शर्मा' कार्यक्रमात ऐश्वर्याने घेतली कपिलची फिरकी
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-10-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan says about most handsome man in her life