बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाची सध्या भरपूर चर्चा आहे. दिग्दर्शक करण जोरहला चित्रपटात ऐश्वर्या आणि रणबीरचे चुंबनदृश्य चित्रीत करायचे होते, पण ऐश्वर्याने त्यास नकार दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रणबीरसोबतच्या चुंबनदृश्याला ऐश्वर्या तयार नव्हती. तिने तसे करणला कळवले आणि ‘तो’ सीन चित्रीत करण्यास नकार दिला. करणही त्या सीनला घेऊन ऐश्वर्याच्या मागे लागला नाही. त्याने आता हा सीन ऐश्वर्याचा प्रत्यक्ष सहभाग न घेता वेगळ्या पद्धतीने चित्रीत करण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, ऐश्वर्याने याआधी अभिनेता हृतिक रोशनबरोबर ‘धूम-२’ चित्रपटात चुंबनदृश्य चित्रीत केले होते. आता मात्र तिने या दृश्याला नकार दिला आहे. करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या, रणबीरसह अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील दिसणार असून, चित्रपट पुढील वर्षी २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.