“दारुसाठी रांगेत उभे राहिलेले लोकं तर खतरो के खिलाडी”; अभिनेत्याने घेतली फिरकी

लॉकडाउनमध्ये दारुची दुकानं सुरु केल्यामुळे मतमतांतरं व्यक्त केली जात आहेत.

करोना विषाणूचे वाढते संक्रमण पाहता देशभरातील लॉकडाउन आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. मात्र या वाढीव लॉकडाउनमध्ये दारुची दुकानं सुरु करण्यासाठी सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. दुकानं सुरु होताच दारु खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली. प्राणघातक विषाणूची पर्वा न करता दारुसाठी गर्दी करणाऱ्या या लोकांना अभिनेता एजाज खान याने ‘खतरों के खिलाडी’ असं म्हटलं आहे.

“लॉकडाउन सुरु असताना ५५० करोनाग्रस्त रुग्ण होते. आता ३९ हजार रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. यालाच म्हणतात खतरों के खिलाडी” अशा आशयाचे ट्विट एजाज खान याने केले आहे. ‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये भाग घेणारे कलाकार अत्यंत धोकादायक स्टंट करताना दिसतात. सध्या करोनाग्रस्त वातावरणात दारुसाठी गर्दी करणे देखील धोकादायकच आहे. या पार्श्वभूमीवर एजाज खान याने ही तुलना केली आहे.

एजाज खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसतो. अलिकडेच केलेल्या एका ट्विटमुळे त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रितिक्रिया दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajaz khan comment on alcohol in lockdown mppg

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या