बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या नव्या क्लिन शेव लूकने सर्वांना थक्क केले. गेल्या शुक्रवारी अक्षयने त्याचा दाढी असलेला फोटो ट्विट केला होता.
“ओ ओह!!! माझी दाढी असलेल्या लूकची शेवटची झलक पाहून घ्या. कोणी दुःखी आहे का….”, असे अक्षयने ट्विट केले होते. मात्र, त्यानंतर दाढी केल्यावर आपण मुलगी नितारासाठी असे केल्याचेही त्याने सांगितले.
“मला माझ्या जुन्या लूकची आठवण येईल. पण, माझी मुल यामुळे फार खूश होणार आहेत. माझ्या मुलीला दाढीचा फार राग यायचा कारण ती तिला बोचायची.”, असे अक्षयने ट्विट केले.
अक्षयने त्याच्या आगामी चित्रपट ‘गब्बर’करिता दाढी ठेवली होती. या चित्रपटात अक्षय आणि श्रुती हसनची मुख्य भूमिका आहे. प्रकाश राज, सोनू सूद आणि सुनील ग्रोवर यांनीही महत्वाच्या सहायक भूमिका केल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक क्रिश दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साली आणि वायकॉम १८ने केली आहे. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘रमाना’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा गब्बर हा रिमेक आहे. या वर्षी २५ डिसेंबर ‘गब्बर’ प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
मुलगी नितारासाठी अक्षयचे क्लिन शेविंग
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या नव्या क्लिन शेव लूकने सर्वांना थक्क केले.

First published on: 01-04-2014 at 12:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar goes clean shave for daughter nitara