‘बेलबॉटम’चे चित्रीकरण पूर्ण

या आठवडय़ात दोन गोष्टी पूर्ण करत त्याने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

करोनाकाळात अनेक आघाडीचे कलाकार शांतपणे घरात बसून परिस्थिती निवळण्याची वाट पाहत आहेत, मात्र अभिनेता अक्षयकुमारला क्षणाचीही उसंत नाही. टाळेबंदीतही वेगवेगळ्या जाहिराती, सरकारी उपक्रम यात व्यग्र असलेल्या अक्षयने टाळेबंदी शिथिल होताच चित्रपटांचा एकच धडाका लावला आहे. गेल्या सहा महिन्यांत सगळे ठप्प झालेले असताना अक्षयकुमार मात्र विविध जाहिराती-चित्रपटांमधून सातत्याने प्रेक्षकांसमोर येतो आहे. या आठवडय़ात दोन गोष्टी पूर्ण करत त्याने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. एक म्हणजे त्याच्या बहुचर्चित ‘लक्ष्मीबॉम्ब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख त्याने जाहीर के ली आहे आणि दुसरं म्हणजे टाळेबंदीच्या काळातच नायिका शोधून, निर्मात्याच्या बरोबरीने चित्रीकरणासाठी जागा शोधून स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण पूर्ण करून ‘बेलबॉटम’ अवतारात अक्षयकुमार आपल्या चमूसह मायदेशी परतला आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा त्याचा चित्रपट दिवाळी प्रदर्शनाच्या तयारीत होता. पण अजूनही देशभरात चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत आणि करोनाचा प्रादुर्भावही कमी झालेला नाही, हे लक्षात घेत या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्याआधी दिवाळीच्या मुहूर्तावर ९ नोव्हेंबर रोजी राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मीबॉम्ब’ हा चित्रपट भारतात डिजिटली प्रदर्शित होणार असल्याचे त्याने जाहीर के ले. घरीच बसून घरचे पॉपकॉर्न आणि समोसे खात सुरक्षित चित्रपट पाहा, असे आवाहनही त्याने चाहत्यांना के ले आहे. कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला त्याचा हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अरब अमिरातीत चित्रपटगृहातून प्रदर्शित होणार आहे. याच काळात त्याने जॅकी भगनानी निर्मित आणि रणजीत तिवारी दिग्दर्शित ‘बेलबॉटम’ या चित्रपटाची घोषणा के ली होती.

रेट्रो काळातील कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे आणि कसे करायचे?,  हा प्रश्न निर्मात्यांसमोर होता. या चित्रपटाची नायिकाही निश्चित झाली नव्हती. मात्र टाळेबंदी शिथिल होता होता नायिके चा शोध पूर्ण झाला. आणि ‘वॉर’ फे म अभिनेत्री वाणी कपूर हिचे नायिका म्हणून शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर स्कॉटलंडमध्ये मर्यादित चमूसह चित्रीकरण करायचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यानुसार टीम काही दिवसांपूर्वी रवानाही झाली. विलगीकरणाचे सगळे नियम पाळून कमीतकमी दिवसांत आणि खर्चात चित्रीकरण व्हावे यासाठी अक्षयने निर्मात्यांसमोर दोन पाळ्यांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार एके का युनिटने आळीपाळीने चित्रीकरण संपवत ‘बेलबॉटम’ पूर्ण के ला. टाळेबंदीच्या काळात चित्रीकरण होऊन पूर्ण झालेला हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे कामही त्याच वेगाने पूर्ण होईल यात शंका नाही. अत्यंत शिस्तीत आणि एका वेगाने काम करणाऱ्या अक्षयकुमारचे सध्या त्याच्या सहकाऱ्यांकडूनही कौतुक होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar movie bell bottom shooting complete zws

ताज्या बातम्या