अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ट्विंकलने एअरलाइन्समध्ये असलेल्या अस्वच्छतेवर ताशेरे ओढले आहेत. तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘मुंबईहुन उडणाऱ्या विमानांनी आयुष्याच्या सुरक्षेसाठी ज्याकाही वस्तू ठेवता त्याऐवजी कृपया ओडोमॉस ठेवत जा. आत्ताच सात मच्छर मारले आहेत. बुडून मरण्याऐवजी डेंग्यूने मरण्याचा धोका अधिक आहे.’ ट्विंकलच्या या पोस्टनंतर अनेक फॉलोवर्सनी कमेंट करायला सुरूवात केली. एका युझरने लिहिले की, ‘तुझ्या देशभक्त नवऱ्याला आता यावरही एखादा सिनेमा करायला सांग.’
Airlines taking off from Mumbai- Instead of the life vest could you please put a tube of odomos under the seat- Killed 7 mosquitoes before buckling in this morning-Odds of dying due to dengue may be higher than drowning:)
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) April 20, 2018
दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘BYOO – Bring Your Own Odomos अर्थात स्वतःचे ओडोमॉस स्वतः आणा.’ दुसऱ्या एका युझरने मजेशीर अंदाजात लिहिले की, ‘तुम्हाला सात खून माफ झाले आहेत. आता तुम्ही एअरलाइन्सकडून अजून काय अपेक्षा करता.’ ‘मच्छर- याने आता काही होणार नाही आम्ही स्वतःला अपग्रेड केले आहे. अनेकांनी ट्विंकलच्या या पोस्टवर गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी ट्विंकलने तिच्या ट्विटमध्ये एअरलाइन्सचे नाव का नाही टाकले असा प्रश्नही उपस्थित केला. एका युझरने लिहिले की, ‘तू हुशार आहे जी त्या एअरलाइन्सची तक्रार नाही केलीस. नाही तर एअरलाइन्सचे कर्मचारी तुझ्यावर नाराज झाले असते आणि तुझ्या नवऱ्याने ते विमानच तुझ्यासाठी विकत घेतले असते.’
https://twitter.com/PriyaPVarrierFA/status/987259717415137280