आलिया भट्ट आणि कॅतरिना कैफ या दोघी सध्या ‘ड्रीम टीम टूर’ मध्ये व्यस्त आहेत. या टूरमध्ये वेगवेगळ्या शहरात त्यांचे डान्स परफॉर्मन्स आहेत. त्यामुळे सतत त्यांना डान्सचा सराव करावा लागतो. त्यांच्या याच डान्सचा सराव त्या सध्या न्यूयॉर्कमध्ये करत आहेत. त्यांच्या व्यस्त कारभारातून त्या न विसरता त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत.
आलिया भट्टने तिच्या ट्विटरवर तिचा आणि कतरिनाचा अॅरोबिक्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अॅरोबिक्समध्ये काय आहे नवीन असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण, या दोघीही स्विमिंग पूलमध्ये अॅरोबिक्स करताना दिसत आहेत. यासाठी त्यांना खास काळ्या रंगाचा ड्रेसही घातला आहे.
या व्हिडिओमध्ये त्या करत असलेले व्यायाम दिसायला सोपे जरी असले तरी त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. आलियाने या व्हिडिओखाली आकर्षक असा मॅसेजही लिहिला आहे. ‘पुढील कार्यक्रमाच्या तयारीसाठी पाण्यातले अॅरोबिक्स. हे वाटतं तितकं सोपं नाही.’
ही ‘ड्रीम टीम टूर’ हॉस्टननंतर ओरलॅन्डो, शिकागो, लॉस एंजलिस आणि न्यू जर्सी इथे ही टूर होईल. हा लाईव्ह शो म्हणजे त्यांच्या तिथल्या चाहत्यांना पर्वणीच असणार आहे. या वेगवेगळ्या ठिकाणी हे कलाकार डान्स परफॉर्मन्स करणार आहेत. २१ ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यानंतर ही टूर पूर्ण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt and katrina kaif exercises aerobics in water
First published on: 20-08-2016 at 20:23 IST