‘राजी’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेत्री आलिया भट्ट प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. आलियाच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक- समीक्षकांकडून प्रशंसा करण्यात आली. या यशासोबतच आता आलियाने तिचं मानधन वाढवल्याचं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलियाने या मानधनात चार कोटींची वाढ केली आहे. यापूर्वी एका चित्रपटासाठी ती पाच कोटी रुपये मानधन घेत होती. आता ती वाढवून नऊ कोटी रुपये इतकी केली आहे. ‘राजी’नंतर ती जे चित्रपट स्विकारत आहे त्यासाठी नऊ कोटी रुपयांचं मानधन घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

वाचा : दीपिकाच्या ‘लुंगी डान्स’ची हॉलिवूडलाही भुरळ

आलियाने आतापर्यंत दहा चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यापैकी ‘शानदार’ वगळता नऊ चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरले. ‘उडता पंजाब’, ‘टू स्टेट्स’, ‘हायवे’ यांसारख्या चित्रपटांमधून तिचं दमदार अभिनय कौशल्य दिसून आलं. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘राजी’मुळे तिच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं असं म्हटल्यास वावगे ठरणार आहे. येत्या काळात ती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबतही काम करणार असल्याची चर्चा आहे. सध्या तिच्या हातात ‘कलंक’, ‘गली बॉय’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे तीन आगामी चित्रपट आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt hikes her fee after success of raazi
First published on: 31-05-2018 at 18:54 IST