‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या प्रमोशननंतर आलियाने पुढच्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करण्याआधी छोटासा ब्रेक घेतला होता. या ब्रेकमध्ये तिने आपला अधिकतर वेळ मित्र-परिवारासोबत आणि एक नवीन छंद जोपासण्यामध्ये घालवला. या छोटेखानी ब्रेकनंतर आलिया आता पुन्हा एकदा सिनेमांच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती मेघना गुलझार यांच्या ‘राझी’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. या सिनेमात ती भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे जी पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करते. विकी कौशल हा तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसेल.
सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग, दिग्दर्शक फरार
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली की, ‘मला वाटतं की जेव्हा मी खूप दमते तेव्हा मूळ स्थितीत येण्यासाठी मला फक्त १० दिवस लागतात. त्यानंतर मी पुन्हा त्याच जोमाने कामावर रुजू होते. जेव्हा मी सुट्टीवर होते तेव्हा मी त्या वेळेचा सदुपयोग केला आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल फारशी तक्रार केली नाही.’
…म्हणून विवेक ऑबेरॉयच्या भावाने अॅशला दिला नकार
‘सुट्ट्यांदरम्यानही जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवातीला मला याचा थोडा त्रास झाला. मात्र नंतर कामाची मला इतकी सवय झाली की सुट्ट्यांदरम्यानही मला आता काम करायची इच्छा होते. मात्र यावेळी काम म्हणजे लाईव्ह कार्यक्रम किंवा जाहिरातींच शूटिंग नव्हे.’
आलियाने सांगितले की, ‘सिनेमांशिवाय करत असलेले काम हे जरी काम असले तरी तिचं पहिलं प्रेम हे सिनेमेच आहेत. सिनेमांप्रमाणेच जाहिराती आणि इतर गोष्टी या कामांमध्येच मोडत असल्या तरी सिनेमांचं चित्रीकरण करणं याची तुलना कशासोबत होऊ शकत नाही. सिनेमांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता जे तुम्हाला इतर कोणीही शिकवू शकत नाही.’