"नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण..." कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य | American rapper Kanye West sparked a controversy said that he loves Hitler nrp 97 | Loksatta

“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य

“मला हिटलरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी दिसतात”, असेही तो यावेळी म्हणाला.

“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य
कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अमेरिकेचा प्रसिद्ध गायक, रॅपर कान्ये वेस्ट उतरला आहे. त्यामुळे तो सातत्याने चर्चेत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कान्ये वेस्ट हा सध्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. एका मुलाखतीदरम्यान कान्येने अॅडॉल्फ हिटलरचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, कान्ये वेस्टने नुकतंच एका लाईव्ह स्ट्रीमदरम्यान नाझी आणि अॅडॉल्फ हिटलरबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. त्याचे हे कौतुक ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण या मुलाखतीत त्याने एका काळ्या मास्कचा वापर करत स्वत:चा चेहरा लपवला होता. यावेळी कान्ये वेस्टने मानसिक आजारांसह त्याच्या संघर्षाबद्दल भाष्य केले. मात्र यावेळी त्याने काही वादग्रस्त विधानही केली.
आणखी वाचा : हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

अॅलेक्स जोन्सशी बोलताना कान्ये वेस्ट म्हणाला, “मला हिटलरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी दिसतात. प्रत्येक माणसात काही चांगली मूल्य असतात, हे हिटलरला पूर्णपणे लागू आहेत, असे मला वाटते. झिओनिस्ट असो वा हिटलर हे व्यक्तींबद्दल नाही, म्हणूनच यानिमित्ताने बायबलबद्दल सेटनची आठवण होते. तो एका बाजूला अध्यात्मिक असला तरी दुसऱ्या बाजूला अनेकविध मार्गांनी सामान्यांना ईश्वराकडे जाण्यापासून रोखतो आणि असुरी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो.”

“ज्युइश मीडियाने असा भ्रम निर्माण केला आहे की नाझी आणि हिटलर यांच्याकडे जगाला देण्यासारख्या काहीही चांगले नव्हते. हिटलरने अनेक महामार्गांचा शोध लावला. सध्या मी संगीतकार म्हणून वापरत असलेल्या मायक्रोफोनचा शोधही त्यानेच लावला. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी मौल्यवान असते. त्यामुळेच मला हिटलर विशेष आवडतो. तसेच आपण नाझी आणि हिटलरबद्दल वाईट बोलणे बंद करायला हवं. मला त्यांच्याविषयी फार प्रेम वाटते”, असेही त्याने म्हटले.

दरम्यान ‘द हॉलीवूड रिपोर्टर’च्या अहवालानुसार कान्ये वेस्टने यापूर्वीही ट्विटरवर अनेक वादग्रस्त वक्तव्य, ट्विट केले होते. तसेच आता कान्ये वेस्ट याचे ट्विटर अकाउंट हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते. यापूर्वी २०२२ ऑक्टोबरमध्ये असंवेदनशील ट्वीटमुळे कान्येच्या अकाउंटवर प्रतिबंध लावण्यात आला होता. केवळ ट्विटरच नव्हे तर इंस्टाग्राम अकाउंटसाठीही अशी कारवाई करण्यात आली होती.

आणखी वाचा : “मी लहानपणापासूनच…” ‘बिग बॉस’मधील ‘गोल्डमॅन’ने साडेचार कोटींचे दागिने घालण्यामागचे सांगितले कारण

दुसरीकडे कान्ये वेस्ट हे नाव अलीकडे किम कार्देशीयनसह घटस्फोटावरूनही चर्चेत आले आहे. अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कान्येने किमला दर महिन्याला २० लाख डॉलर्स देण्याच्या अटीसह त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला आहे. कान्ये वेस्ट येत्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतारण्याचीही शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 19:11 IST
Next Story
“तुमच्या शरीराची ठेवण…” बोल्ड फोटो शेअर करत प्राजक्ता माळीने दिला हटके सल्ला