करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याने शेकडो मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास मदत केली. गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, शिवाय बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी देखील तो प्रयत्न करतोय. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. परंतु सोनूने केवळ गरीबांनाच नव्हे तर काही सेलिब्रिटींना देखील मदत केली आहे. यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अमित साध. ‘सुलतान’, ‘काय पो छे’, ‘रेस ३’ यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अमितला सोनू सूदमुळे पहिला ब्रेक मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – सलमानमुळेच ‘या’ अभिनेत्रींना करता आलं बॉलिवूडमध्ये पादार्पण

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

“सोनू मुळेच मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. आज मी जे काही यश मिळवलं त्याचं श्रेय मी सोनूला देतो. आज त्याच्या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. परंतु खरं सांगायचं झालं तर तो गेली कित्येक वर्ष लोकांची मदत करतोय.” अशा आशयाचं ट्विट करुन अमितने सोनू सूदचे आभार मानले. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – बॅटमॅन-सुपरमॅनला विसरा; या ‘लेडी सुपरहिरो’ दाखवतायेत खरा दम

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit sadhs thank you note to sonu sood mppg
First published on: 28-12-2020 at 15:00 IST