…आणि झोपण्याचा अभिनय करता करता बिग बी खरंच झोपले

‘सेटवर झोपण्याचा सुखद अनुभव’

amitabh bachchan
अमिताभ बच्चन (संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूडचे ‘शहनशाह’ म्हणजेच अमिताभ बच्चन सध्या आगामी ‘१०२ नॉट आऊट’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या शूटिंगदरम्यानचा एक गमतीशीर किस्सा बिग बींनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला. अनेकदा कलाकार सेटवर झोपण्याचे अभिनय करताना खरंच झोपी जाण्याचे किस्से आपण आजवर ऐकले. असाच किस्सा अमिताभ बच्चन यांच्यासोबतही घडलाय.

स्क्रिप्टमधील झोपण्याचे दृश्य कोणत्याही कलाकारासाठी आनंदाचे क्षण असतात असं त्यांचं म्हणणं आहे. सोमवारी म्हणजेच ३१ जुलैच्या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की, ‘झोपणे ही आपल्या सर्वांसाठी एक आवश्यक प्रक्रिया आहे. त्याची कमतरता सेटवर पूर्ण करण्याची संधी मिळणे म्हणजे अत्यंत आनंदाचे असते.’ यासोबतच त्यांनी सेटवर काढलेला त्यांचा एक फोटोदेखील शेअर केलाय. या फोटोमध्ये बिग बी झोपताना दिसत आहेत.

‘सेटवरील लाइटिंग, अॅक्शन आणि दृश्याचे शूटिंग सुरु असतानादेखील एखाद्याला खरंच झोप येऊ शकते. हा खरंच एक सुखद अनुभव आहे. मला खरंच झोप लागली आणि शूटिंग संपली हे सांगण्यासाठी सहकलाकरांनी मला उठवलं’, असं त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलंय.

वाचा : हुबेहूब प्रियांकासारखी दिसणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस’च्या घरात?

‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटातून २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अमिताभ आणि ऋषि कपूर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. गुजराती लेखक- दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात बिग बी १०२ वर्षीय व्यक्तीची भूमिका तर ऋषी कपूर ७५ वर्षीय त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. अमिताभ आणि ऋषी कपूर यांना बापलेकाच्या भूमिकेत पाहणे खरंच औत्स्युक्याचं ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan actually sleeped on the set while doing acting of sleeping