दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासोबत काम करताना पोटात गोळा येतो, असे उद्‌गार चक्क बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी पणजी येथे काढले आहेत. बल्की यांच्यासोबत हिट चित्रपट केल्यानंतरही मोठ्या मनाने अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “चीनी कम’ आणि “पा’ या चित्रपटांतून अमिताभ यांनी बल्की यांच्यासाठी उत्कृष्ट काम केले आहे.
त्यांच्या नव्या चित्रपटाचे सध्या गोव्यात चित्रीकरण सुरू आहे. “आर. बाल्की यांचा नवा चित्रपट आणि पहिल्या दिवशीच्या चित्रीकरणाची भीती, अनिश्‍चितता… आणि पोटात गोळे..’ असे “पा’साठी तिसरा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेल्या बच्चन यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. या चित्रपटाचे शिर्षक अद्याप ठरविण्यात आलेले नसून यात तमिल सुपरस्टार धनुष आणि कमल हसनची मुलगी अक्षरा यांच्याही भूमिका आहेत.
अमिताभ बच्चन यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या भूतनाथ रिटर्न्स चित्रपटाने तिकीट बारीवर चांगली कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onधनुषDhanush
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan nervous to shoot r balkis next
First published on: 22-04-2014 at 10:47 IST