वयाची पासष्ठी किंवा सत्तरी म्हणजे ‘निवृत्तीनंतरचा काळ सुखाचा, आरामाचा किंवा औषधांचा’, अशीच बहुतेकांची परिस्थिती असते. शारीरिक व मानसिक तक्रारी सुरु झालेल्या असतात. पूर्वीचा उत्साह, ताकद कमी झालेली असते. पण ७४ वर्षीय एक ‘आजोबा’ मात्र याला अपवाद ठरले आहेत.
आजही तरुणाला लाजवेल अशा सळसळत्या उत्साहात ते कार्यरत आहेत. तरुणाईचे प्रतिक असलेल्या ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘ब्लॉग’ या क्षेत्रातही ते आघाडीवर आहेत. ते आजोबा आहेत बॉलिवूडचे ‘बीग बी’ अर्थात ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन. ‘अजून यौवनात’ असलेल्या अमिताभ लवकरच एका मासिकाच्या मुखपृष्ठावरील जाहिरातीसाठी ‘जेम्स बॉण्ड लूक’मधील ‘पोज’मध्ये पाहायला मिळणार आहेत. चित्रपट, जाहिराती यातून अमिताभ व्यग्र असतातच पण आता या वयात ‘ललनां’च्या गराडय़ात उभे राहून जेम्स बॉण्डच्या लूकमधील जाहिरातींमधून दर्शन देणार आहेत. अमिताभ यांच्या या नव्या जाहिरातीमळे बॉलिवूडचे तेच ‘महानायक’ आहेत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
जेम्स बॉण्डच्या ‘लूक’मधील एका जाहिरातीत आपण दिसणार असल्याची माहिती अमिताभ यांनीच आपल्या ‘ब्लॉग’वर दिली आहे. एका मासिकासाठी ‘फोटोशूट’ करणार असून अनेक सुंदर ‘ललनां’च्या गराडय़ात असलेल्या जेम्स बॉण्डसारखा आपला ‘लूक’या जाहिरातीत असेल. वयाच्या ७४ व्या वर्षी अशी संधी सहसा कोणाला मिळत नाही, त्यामुळे ही व्यक्तिरेखा सादर करण्याचा आनंद आपण घेणार असल्याचेही अमिताभ यांनी या ब्लॉगवर म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan to appear as james bond on magazine cover
First published on: 31-03-2016 at 01:52 IST