बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘बॉब बिस्वास.’ नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटातील अभिषेकच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर शेअर करत अभिषेकला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी देखील अभिषेकसाठी पोस्ट लिहिली आहे.
बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्यांनी, ‘तू माझा मुलगा आहेस हे सांगताना मला अभिमाना वाटतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘जय भीम’मधील अभिनयाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणण्याऱ्या ‘संगिनी’ विषयी जाणून घ्या
‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटाच्या दोन मिनिटे एकोणचाळीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बॉब बिस्वासचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बॉब बिस्वास कोमामधून बाहेर येतो आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्याला त्याचे कुटुंबीय तसेच भूतकाळाविषयी काही माहिती नसते. तो खरच सगळं विसरला आहे की त्यामागे काही कारण आहे हे प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.