चित्रपट समीक्षकांनी नावजलेल्या अमोल गुप्ते यांच्या ‘स्टॅन्ली का डब्बा’नंतर आता त्यांचा ‘हवा हवाई’ चित्रपट लवकरच येत आहे. मात्र, १८ एप्रिलऐवजी हा चित्रपट ९ मे ला प्रदर्शित होणार आहे.
करण जोहरचा ‘२ स्टेट्स’ १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटासोबतचा टकराव टाळण्यासाठी गुप्ते यांनी चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. हवा हवाईमध्ये साकीब सलीम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार पार्थो गुप्ते यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ करणार असून, याच संस्थेने ‘स्टॅनली का डब्बा’चीही निर्मिती केली होती.