‘राझी’ चित्रपटाने नुकताच शंभर कोटींचा पल्ला गाठला असून या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरने आलिया भट्टच्या जावेची भूमिका साकारली आहे. १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केल्याबद्दल अमृतावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री माधुरी दीक्षितने या आधी शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असला आणि जरी ती मराठी असली तरीही तिची सुरुवात हिंदी चित्रपटांपासूनच झाली होती. त्यामुळे माधुरी दीक्षितची गणना बॉलिवूड अभिनेत्रींमध्येच केली जाते. अमृताची सुरुवात मराठीतून झाली आणि बॉलिवूड प्रवेशानंतर कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘राझी’ च्या निमित्ताने तिचा शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश झाला आहे. मेघना गुलजार यांचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar
First published on: 03-06-2018 at 02:07 IST