हिंदी चित्रपट सृष्टीत नव्वदच्या दशकामध्ये विविध कलाकारांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चांना उधाण आले होते. संजय दत्त, सलमान खान, माधुरी दीक्षित यांसारख्या कलाकारांची नावेही या यादीत समाविष्ट होती. याच दिवसांतील आणखी एक बहुचर्चित जोडी म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोन्ही कलाकारांमध्ये असणारे वयाचे अंतर आणि दोघांच्याही कारकिर्दीमध्ये असणारी दरी पाहता त्यांचे प्रेम फार काळ टिकणार नाही असेच अनेकांना वाटत होते. पण, तेरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात सैफ आणि अमृताने नेहमीच एकमेकांना साथ देत अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आणि बऱ्याच बी टाऊन चर्चांनुसार सैफ आणि अमृताचे लग्न हा विषय अनेक ठिकाणी चर्चिला जात होता. इतकेच नव्हे तर एका मासिकाच्या मुखपृष्ठावरही सैफ आणि अमृताच्या या प्रेमकहाणीची झलक पाहायला मिळाली होती. ‘मुव्ही’ या मासिकाच्या १९९१ च्या नोव्हेंबर महिन्यातील आवृत्तीवर ‘मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शिअल लव्ह स्टोरी ऑफ १९९१’ असे म्हणत अमृता आणि सैफची प्रेमकहाणी सर्वांसमोर आणली होती. या मासिकाच्या मुखपृष्ठावर सैफ आणि अमृताचा एक फोटोदेखील पाहायला मिळाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An old magazine cover of saif ali khan and amrita singh featured most controversial love story of
First published on: 21-02-2017 at 10:24 IST