अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमांना शुक्रवारपासून जामनगरमध्ये सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग होईल आणि लग्न मुंबईत होणार आहे. लग्नाच्या तयारीदरम्यान अनंत यांनी होणारी पत्नी राधिका मर्चेंटचं कौतुक केलं आहे.

‘इंडिया टुडे’शी बोलताना अनंत म्हणाले, “मी नशीबवान आहे की राधिका माझ्या आयुष्यात आली. ती माझी स्वप्नातील राणी आहे. लहानपणी मला वाटत होतं की मी कधीही लग्न करणार नाही, कारण मी नेहमीच प्राण्यांची काळजी घेण्यात व्यग्र असायचो. पण जेव्हा मी राधिकाला भेटलो तेव्हा मला कळलं की ती माझ्यासारखीच आहे. तिच्या मनात प्राण्यांबद्दल औदार्य आहे आणि तिला प्राण्यांची काळजी घ्यायला आवडतं.”

Photo : अनंत अंबानीपेक्षा मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढे’ अंतर

अनंत यांना लहानपणापासूनच आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. त्यांना लठ्ठपणा आहे. नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अनंतला दम्यामुळे वजन कमी करणं खूप कठीण जातं. त्यांचा वजन कमी करण्याचा प्रवास कठीण होता. मात्र कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी वजन कमी करण्यात यश मिळवलं होतं. पण कालांतराने ते पुन्हा वाढलं, आता परत अनंत यांनी वजन कमी केल्याचं दिसतंय. “राधिकाने या वजन कमी करण्याच्या प्रवासात मला खूप साथ दिली आहे. मला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. माझ्या कठीण काळात राधिका नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली,” असं अनंत म्हणाले.

मिस्टर अँड मिसेस कलरफूल! पूजा सावंत अडकली लग्नाच्या बेडीत, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत यांनी सांगितलं की राधिकाने त्यांना नेहमीच हिंमत दिली. त्यांच्या आई-वडिलांनीही त्यांना कधी आजारी असल्याची जाणीव करून दिली नाही. “माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मी आरोग्य समस्यांशी लढू शकलो. नंतर राधिकाच्या येण्याने मला हिंमत मिळाली. ती मला म्हणते, ‘हिंमत हारू नका, नेहमी लढत राहा. अनेक लोकांना तुमच्यापेक्षा जास्त त्रास आहे’. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी मी देवाचा आभारी आहे. इतरांच्या म्हणण्याकडे मी कधी लक्ष दिले नाही. पाठिमागे बोलणं हा लोकांचा व्यवसाय आहे, पण माझ्यासाठी माझे कुटुंब आणि त्यांचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे.”