जामनगरमध्ये सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री- वेडिंग सोहळा पार पडतोय. मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये बोलताना मुकेश अंबानी भावुक झाले. अनंत आपल्याला वडील धीरूभाई यांची आठवण करून देतो, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनंत व राधिकाचं खूप कौतुक केलं.

मुकेश अंबानी गुजरातमध्ये अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीत उपस्थित असलेल्या जगभरातील पाहुण्यांना संबोधित करत होते. यावेळी मुकेश यांनी अनंत व राधिकाच्या नात्याचं कौतुक केलं. इतकंच नाही तर अनंत त्याचे आजोबा व रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणारे प्रख्यात उद्योगपती दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्यासारखाच आहे, असंही ते म्हणाले.

Raj Thackeray Padawa Melava
MNS Gudi Padwa Melava : अमित शाहांच्या भेटीत काय ठरलं? राज ठाकरेंनी शिवतीर्थवरून सांगितला घटनाक्रम, म्हणाले….
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा
Late Punjabi singer Sidhu Moose Wala's father Balkaur Singh share new video and target to punjab government
“…तर मला अटक करा”, तीन दिवसांपूर्वी पुन्हा बाबा झालेले सिद्धू मुसेवालाचे वडील असं का म्हणाले? जाणून घ्या…

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स; मंचावर थिरकले अंबानी कुटुंबीय, तर गायिका भारताबद्दल म्हणाली…

“संस्कृतमध्ये अनंतचा अर्थ ‘ज्याला अंत नाही’ असा होतो. मला अनंतमध्ये अनंत क्षमता दिसते. मी जेव्हा अनंतला पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये मला माझे वडील धीरूभाई दिसतात. त्यांची ‘मी हे करू शकतो, करेन आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ ही वृत्ती मला अनंतमध्ये दिसते. त्याला राधिकाच्या रुपात एक आदर्श जोडीदार मिळाली आहे. ती क्रिएटिव्ह उर्जेचा साठा आहे, ती प्रेम आणि काळजीचा शांत वाहणारा झरा आहे. अनंत व राधिका ही देवाने बनवलेली जोडी आहे,” अशा शब्दांत मुकेश अंबानी यांनी मुलगा व होणाऱ्या सूनेचं कौतुक केलं.

रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म

दरम्यान, जामनगर शहर सध्या अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी आकर्षक विद्युत रोषणाईने सजलं आहे. या सोहळ्यासाठी शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, ‘जवान’ दिग्दर्शक ॲटली आणि त्याची पत्नी, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख, करीना व सैफ मुलांसमवेत जामनगरला पोहोचले आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला.

“राधिका माझ्या स्वप्नातील राणी,” अनंत अंबानींचे होणाऱ्या पत्नीबाबत विधान; वाढलेल्या वजनाबद्दलही केलं भाष्य

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जानेवारी २०२३ मध्ये मुंबईत साखरपुडा झाला होता. त्यानंतर वर्षभराने त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याचं आयोजन जामनगरमध्ये करण्यात आलंय. दोघांचं लग्न याच वर्षी जुलैमध्ये होईल असं म्हटलं जातंय. जामनगरमधील या तीन दिवसीय कार्यक्रमात जगभरातील जवळपास एक हजार पाहुणे हजेरी लावतील.