बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची आई स्नेहलता पांडे यांचं निधन झालं. शनिवारी (१० जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी चंकी पांडे यांचं सात्वन करत स्नेहलता पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आईच्या निधनानंतर शनिवारी चंकी पांडे यांच्यासह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. स्नेहलता पांडे यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर चंकी पांडे आणि भावना पांडे हे दोघेही स्नेहलता पांडे यांच्या वांद्रे येथील घरी पोहोचले. तसेच समीर सोनी, नीलम, सोहेल खानचा मुलगा निरवाण खान आणि इतर काही कलाकार वांद्रेतील निवासस्थानी पोहोचले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya (@ananyapanday)

स्नेहलता पांडे यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. मात्र, २०१९ मध्ये अभिनेत्री अनन्या पांडेनं आजीच्या (स्नेहलता) वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘माझ्या तरुण आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हटलं होतं’ या आशयाचे कॅप्शन दिले होतं.