संपूर्ण जगातील लोक सध्या करोना व्हायरसमुळे त्रस्त आहेत. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मृत्यूचा तांडव करणाऱ्या या विषाणूला रोखण्यासाठी सेलिब्रिटीदेखील आता पुढे सरसावले आहेत. दरम्यान प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिने करोनाशी दोन हात करण्यासाठी तब्बल एक मिलियन अमेरिकी डॉलरची मदत केली आहे.

इ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अँजेलिनाने ‘नो किड हंग्री’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेला एक मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास सात कोटी ५० लाख रुपये दिले आहेत. ही अमेरिकन स्वयंसेवी संस्था लोकांना अन्नाची मदत करते. करोना विषाणूमुळे अमेरिकेत सध्या भारताप्रमाणेच लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे या संस्थेवर आता आर्थिक ताण येत आहे. करोनामुळे आलेल्या आर्थिक ताणामुळे ‘नो किड हंग्री’च्या कामात खंड पडू नये, म्हणून अँजेलिनाने मदतीचा हात पुढे केला आहे.

अँजेलिना व्यतिरिक्त लेडी गागा, शॉन मेंडिस, जेम्स होप्स इथपासून अगदी रजनिकांत, सचिन तेंडूलकरपर्यंत अनेकांनी आपापल्या देशात लोकांना करोपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारला आर्थिक मदत केली आहे.

काय आहे करोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

करोना व्हायरस सार्स’मध्ये (SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.