अनिल कपूरला सोनम आणि रिया कपूर या दोन मुली. दोघीही आपल्या व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर आहेत. तर खासगी आयुष्यात सोनम गेली दोन वर्ष दिल्लीस्थित एका व्यावसायिकाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तर रियाचं नाव नवोदित दिग्दर्शक करण बूलानी याच्यासोबत जोडले गेले होते. काही दिवसांपूर्वी दोघांचे लग्नही निश्चित झाल्याची बातमी समोर येत होती. सध्याची बातमीही करणशीच निगडीत आहे.
अनिल कपूर यांच्या निर्मिती संस्थेकडून ‘सात हिंदुस्थानी’ नावाच्या सिनेमाला पाठिंबा दिला जात आहे. या सिनेमाचे नाव नंतर बदलून फक्त ‘सात’ एवढेच ठेवण्यात आले. या सिनेमातून सात नवोदितांचे पदार्पण सिनेसृष्टीत करणार होते. पण सिनेमाच्या निर्मितीमध्ये लागणारा पैसा आणि इतर व्यावसायिक कारणांमुळे हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. या सिनेमाची एवढी चर्चा यासाठीच होत आहे की रियाचा तथाकथित प्रियकर या सिनेमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार होता. आता अनिल कपूर स्वतः या प्रोजेक्टमध्ये लक्ष घालून हे काम पूर्ण करणार आहेत.
या सिनेमाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या संहितेमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. आधी या सिनेमासाठी कलाकारांची निवड करण्यात आली होती. पण आता नव्याने कलाकारांचा शोध सुरु झाला आहे. या वर्षीच्या शेवटी सिनेमाचे शुटिंग सुरु होणार आहे. याआधी अमेरिकेमध्ये याचे शुटिंग ४० दिवसांचे होणार होते. पण आता ते १० दिवसांचे करण्यात आले आहे.
रियाला नेहमीच या सिनेमावर विश्वास होता. रिया स्वतः निर्मातीही आहे आणि सध्या ती ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. तर करणने याआधी ‘वेक अप सिड’ आणि रियाचाच सिनेमा ‘आएशा’साठी सहदिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. अनिल कपूर यांच्या ‘२४’ या मालिकेसाठीही त्याने सह- दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अनिल कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांना करण एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारुपाला यावा असे वाटते. सात हा सिनेमा डब्ब्यात गेला नव्हता तर आम्ही त्यातील कलाकारांवर आणि इतर गोष्टींवर काम करतो होतो असे करणने स्वतः सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2016 रोजी प्रकाशित
मुलीच्या प्रियकरासाठी सरसावला अनिल कपूर
अनिल कपूरच्या निर्मिती संस्थेकडून 'सात हिंदुस्थानी' नावाच्या सिनेमाला पाठिंबा दिला जात आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-09-2016 at 17:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor revives daughter rhea rumoured boyfriend film