छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक छाप सोडली आहे. आता प्रेक्षक ‘पवित्र रिश्ता २’ ची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. या मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता शाहीर शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहीर आधी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिवंगत अभिनेता सुशांतने मानवची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहीरने अंकिता आणि बॉयफ्रेंड विक्की जैन लवकरच विवाह बंधनात अडकू शकतात असे सांगितले आहे.
अंकिता आणि शाहीरने ‘पवित्र रिश्ता २’ च्या प्रमोशनसाठी ‘बॉलिवूड हंगामा’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत अंकिताला ‘ही मालिका संपल्यावर काय करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हसत अंकिता म्हणाली की ‘तिने अजुन काही ठरलं नाही.’ तर शाहीर म्हणाला, ‘अरे तू लग्न करणार आहेस.’ हे ऐकताच अंकिताने शाहीरला गप्प राहण्यास सांगितले.
View this post on Instagram
पुढे अंकिता म्हणाली, ‘मी अजुन असं काही ठरवलेलं नाही. परंतू फेब्रुवारी महिन्यात काही तरी नवीन सुरु करणार आहे.’ या आधी मे महिन्यात अंकिता म्हणाली होती की, ‘ती विक्की जैनसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे.’ दरम्यान, अंकिता गेल्या ३ वर्षांपासून विक्कीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : तैमूर आणि जहांगीरला नावावरून ट्रोल करण्यावर करीना म्हणाली…
तर, ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, ‘होय, मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्साहि आहे आणि मला आशा आहे की ते लवकरच होईल. मला जयपूर-जोधपुरी राजस्थानी लग्न खूप आवडतात. पण मी स्वतः कोणत्या पद्धतीने लग्न करेन हे मी अजुन ठरवलं नाही आहे.’
आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण
दरम्यान, विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये येण्या आधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघे जवळपास ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची पहिली भेट ही ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. २०१६ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.