गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. यातल्या भूमिकांनीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे अण्णा नाईक आणि माई ही दोन पात्र चांगली गाजली आहेत. शेवतांच्या प्रेमात पडलेले अण्णा मालिकेत माईंसोबत कधीच रोमान्स करताना दिसले नाहीत. मात्र आता एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ही जोडी पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसत आहे.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘निसर्गराजा ऐक सांगते..’ या प्रसिद्ध गाण्यावर अण्णा व माईंचा रोमान्स पाहायला मिळतोय. यासोबतच ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..’ या गाण्यावरही अण्णा-माईंनी व्हिडीओ बनवला आहे. त्यामुळे अखेर मालिकेत या दोघांचा रोमान्स पाहायला मिळणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

आणखी वाचा : बिग बींनी दिल्या मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा; झाले ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेत माधव अभ्यंकर अण्णा नाईकांची तर शकुंतला नरे माईंची भूमिका साकारत आहेत. मालिकेच्या पहिल्या सिझनमध्येही अण्णा-माईंच्या भूमिका होत्या. गूढ कथानक व मालवणी भाषेमुळे रात्रीस खेळ चाले – २ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली आहे.