चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतात अनुभव यांनी केलेल ट्विट चर्चेत आहे. त्यांनी ट्विटमध्ये देशातील अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकून दाखवण्याचे चॅलेंज केले होते. आता त्यांच्या या ट्विटवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांचे मत मांडतच अनुभव सिन्हा यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुभव यांनी ट्विटमध्ये, ‘मी भारतीयांना चॅलेंज करतो की, एक तारीक ठरवा आणि देशातील अल्पसंख्यांकांच्या समोर गुडघे टेकून दाखवा. करु शकता? २ ऑक्टोबर रोजी? इतक्या वर्षांची माफी मागूया. ट्विटर आणि फेसबुकमधून बाहेर पडा’ असे म्हटले होते. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

आता अशोक पंडित यांनी ट्विट करत अनुभव सिन्हा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये या सर्वाची सुरुवात कश्मीरपासून करुया असे म्हटले आहे.

त्यानंतर अशोक पंडित यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यांनी आपण अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतो जेथे सर्व धर्माचे लोक एकत्र आनंदाने काम करतात अशा अशयाचे ट्विट केले होते. सध्या या दोन निर्मात्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. तसेच अनेक चाहते देखील त्यांच्या ट्विटवर कमेंट करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anubhav sinha ashok pandit got into twitter war avb
First published on: 06-06-2020 at 18:32 IST