अभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर केला लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणावर अनुरागचा जुना सहकारी दिग्दर्शक जयदीप सरकार याने प्रतिक्रिया दिली. एका अभिनेत्रीने अनुरागकडे कास्टिंग काऊचच्या बदल्यात काम मागितलं होतं असा चकित करणारा अनुभव त्याने सांगितला.

“२००४ साली मी अनुरागचा असिस्टंट म्हणून काम करत होतो. आम्ही गुलाल या चित्रपटासाठी कलाकारांचं ऑडिशन घेत होतो. त्यावेळी एका तरुणीने अनुरागकडे भेटण्यासाठी वेळ मागितला. तिला या चित्रपटात काम हवं होतं. तिने आपल्या साडीचा पदर खाली पाडून कास्टिंग काऊचच्या बदल्यात काम मागितलं होतं. परंतु अनुरागने तिच्याकडे लक्ष दिलं नाही.” असा किस्सा सांगून जयदीपने अनुरागला पाठिंबा दिला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anurag kashyap payal ghosh jaydeep sarkar casting couch in bollywood mppg

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या