नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात परशा ही व्यक्तिरेखा साकारणारा आकाश ठोसर एका रात्रीत स्टार झाला. या चित्रपटात रिंकू राजगुरुने साकारलेल्या आर्चीला लोकांची पसंती मिळालीच पण त्याचसोबत आकाशच्या अभिनयाचीही सर्वांनी प्रशंसा केली. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. ‘सैराट’नंतर त्याने महेश मांजरेकर यांच्या ‘एफ यू’ या चित्रपटात भूमिका साकारली. त्यानंतर आता आकाश लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची माहिती समोर येत आहे.

या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटेसोबत आकाश झळकणार असल्याचं कळतंय. आकाश यात राधिकाच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यातच त्याची शूटिंग पूर्ण झाली. यामध्ये चार लघुकथा असून चार वेगवेगळे दिग्दर्शक या लघुकथांचं दिग्दर्शन करणार आहेत. तर आकाश आणि राधिकाच्या कथेचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. विशेष म्हणजे ही लघुकथा राधिकाने स्वत: लिहिली आहे. रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Padmavati controversy : राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातील अन्य तीन कथांपैकी एक झोया अख्तरने दिग्दर्शित केली आहे, ज्यामध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. तर अन्य एक कथा दिवाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केली आहे. बॅनर्जींच्या या कथेत अभिनेत्री मनिषा कोईराला एका अनोख्या रुपात पाहायला मिळणार आहे.