भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून विराट कोहलीचे ‘लेडी लक’ म्हणजेच अनुष्का शर्मासुद्धा त्याच्यासोबत या दौऱ्यामध्ये सहभागी झाली आहे. सोशल मीडियावरील बऱ्याच फॅन पेजेसवरून विरुष्काचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. कुठे हे दोघं एकत्र खरेदीला गेल्याचं पाहायला मिळालं, तर कुठे विराट चक्क केप टाऊनच्या रस्त्यांवर क्रिकेटर शिखर धवनसोबत भांगडा करताना दिसला. दरम्यान, अनुष्का आणि शिखर धवनची पत्नी आएशा यांच्यातही चांगली मैत्री जमली आहे.

जवळपास १० दिवसांच्या या सुट्ट्यांनंतर अनुष्का भारतात परतण्याची तयारी करत आहे. आएशाने तिच्या इन्स्टाग्रामवर अनुष्कासोबतचा एक फोटो पोस्ट करत तिची आठवण येत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिलं. जिममधला हा त्यांचा फोटो असून एकत्रित जिम ट्रेनिंग घेतानाचे क्षण आठवत आएशाने हा फोटो पोस्ट केल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावरील काही फोटोंमध्ये अनुष्का आएशा, भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर आणि रोहित शर्माची पत्नी रितिकासोबत स्टेडियममध्ये मॅच पाहत असल्याचंही दिसून आलं.

https://www.instagram.com/p/Bdmfa8oBQNC/

VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग

भारतात परतल्यावर अनुष्काच्या शूटिंगचं व्यग्र वेळापत्रक राहणार आहे. शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती ‘सुई धागा’ या चित्रपटात वरुण धवनसोबत काम करणार आहे.