बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली लग्नबंधनात अडकणार की नाही, असा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात घोळत आहे. अनुष्का गुरुवारी रात्री तिच्या कुटुंबासह इटलीला रवाना झाली. त्यापाठोपाठ विराटही दिल्लीवरून इटलीच्या दिशेने रवाना झाल्याचे कळते. विमानतळावर विराट हुडीमागे त्याचा चेहरा लपवताना दिसला. तसेच आपल्या चाहत्यांना आणि आसपासच्या सुरक्षारक्षकांना फोटोसाठी कधीही नकार न देणाऱ्या विराटने यावेळी प्रकर्षाने फोटो देणे टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ‘होणार सून ..’ फेम मनिषही अडकणार लग्नाच्या बेडीत

विराट-अनुष्काच्या लग्नाला कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याचीसुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेसोबत सामना खेळत असल्याने विराटचे मित्र या लग्नाला उपस्थिती लावू शकणार नाहीत. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांना विराटने लग्नाचे खास आमंत्रण दिले असल्याचे कळते. त्यामुळे केवळ हे दोनच क्रिकेटर अनुष्का आणि विराटच्या लग्नाला उपस्थित राहाणार असल्याची चर्चा आहे. त्याचसोबत कलाविश्वातून शाहरुख खान, आमिर खान, आदित्य चोप्रा, मनिष शर्मा यांची नावे समोर येत आहेत.

वाचा : राणी मुखर्जीच्या लग्नाबाबतही कोणालाच माहिती नव्हती- अनुष्का शर्मा

विराट-अनुष्काकडून अद्याप त्यांच्या लग्नाविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्काच्या कुटुंबियांसोबत महाराज अनंत बाबा हे भटजीसुद्धा इटलीला गेले आहेत. भटजी, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आणि कलाविश्वातील मित्रमंडळी या साऱ्यांची उपस्थिती पाहता आता ‘विरुष्का’चे शुभमंगल जवळपास नक्कीच असल्याची अनेकांना खात्री होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma virat kohli wedding guest list is viral
First published on: 09-12-2017 at 15:43 IST