‘तुझं माझं जमतंय’ या आगामी मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पम्मी या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे प्रेक्षक सुखावले आहेत आणि ही पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पम्मीने नुकताच डान्सिंग क्वीनच्या मंचावर हजेरी लावलीअसून तिने डान्सिंग क्वीनचा मंच देखील गाजवला आहे. पम्मीचा ठसका प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळाला. डान्सिंग क्वीनच्या मंचावर पम्मीने एक सदाबहार नृत्य सादर केलं. पम्मीच्या ठसक्याची झलक प्रेक्षकांनी डान्सिंग क्वीनच्या मंचावर तर पाहिलीच पण ही पम्मी नक्की कशी आहे हे लवकरच प्रेक्षकांना तुझं माझं जमतंय या मालिकेतून कळेल.

‘तुझं माझं जमतय’ ही एक विनोदी मालिका आहे. या मालिकेत अपूर्वा, पम्मी या वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तसेच तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता राकेश विचारे आणि अभिनेत्री आसावरी भरती भानुदास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका ४ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apurva nemlekar dance on dancing queen stage avb
First published on: 31-10-2020 at 16:21 IST