अरिजीत सिंह हा बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली आहेत. मात्र आता त्याचा कोलकाता लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ या गाण्यामुळे हे कॉन्सर्ट रद्द झाल्याचे आरोप करण्यात आला आहे. या गाण्यातील गेरुआ या शब्दावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली आहे.

अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रस या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल युवा भाजप नेते इंद्रनील खान यांनी अरिजीतच्या शोवरून तृणमूल सरकारवर टीका केली. ‘इको पार्कमध्ये होणारा अरिजीत सिंगचा शो पश्चिम बंगाल सरकारच्या HIDCO संस्थेद्वारे का रद्द केला गेला? KIFF मध्ये त्याने रंग तू मोहे गेरूआ हे गाणं गायल्याचे हे परिणाम आहेत का’, असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला. इतकंच नव्हे तर त्यांनी टीएमसीवर असहिष्णुतेचाही आरोप केला आहे.
आणखी वाचा : ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे अरिजीत सिंहला मोठा फटका? कोलकातामधील लाइव्ह कॉन्सर्ट रद्द

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
Sudhanshu Trivedi BJP
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यूयॉर्क, थायलंडचे फोटो; भाजपाचा आरोप

तर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीसुद्धा अरिजीतच्या कॉन्सर्टबद्दल एक ट्विट केलं होतं. “KIFF मध्ये अरिजीतने रंग दे तू मोहे गेरुआ हे गाणं गायल्यामुळे त्याचं कॉन्सर्ट रद्द केलं गेलं”, असे त्यांनी म्हटले आहे.

या वादावर आणि भाजपकडून झालेल्या आरोपांवर टीएमसीकडूनही उत्तर देण्यात आलं. HIDCO चे अध्यक्ष फिरहाद हकीम यांनी भाजप नेत्याचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. “कॉन्सर्टच्या आयोजकांनी स्थानिक पोलिसांना याविषयी अधिकृतपणे माहिती दिली नव्हती. त्यांना फक्त तोंडी सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे जी-20 संमेलनसुद्धा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कॉन्सर्टची जागा बदलण्यास सांगितलं आहे. यामागे कोणतंच राजकारण नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा : Video: चिखल, जीवघेणी गर्दी अन्…; अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टनंतर संतापलेले चाहते म्हणाले, “हजारोंची तिकीटं…”

दरम्यान कोलकातामधील इको पार्कमध्ये त्याचा हा लाइव्ह कॉन्सर्ट होणार होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा सुरू होती. या कॉन्सर्टसाठी अरिजीतने बरीच आधीपासून तयारी सुरू केली होती. पण आता तो कॉन्सर्ट रद्द झाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. राजकीय कारणांमुळे आणि हस्तक्षेपामुळे हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचं बोललं जात होतं.