सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकची सर्वांनाच उत्सुकता होती. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरची प्रमुख भूमिका आहे. शाहिदनं या चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं शेअर केलं आहे. या चित्रपटाचं नाव ‘कबीर सिंग’ असणार आहे. य़ापूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही संदीप वांगा करणार असल्याचं समजत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सर्वांनी अर्जुन रेड्डीवर भरभरून प्रेम केलं आता कबीर सिंगलाही तुमच्याकडून त्याच प्रेमाची आशा आहे’ असं म्हणत शाहिदनं पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. गेल्या आठवड्यापासून शाहिदनं ‘कबीर सिंग’ च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई- दिल्लीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.

‘कबीर सिंग’मध्ये शाहिद सोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. ‘एम.एस. धोनी’, ‘लस्ट स्टोरी’ मध्ये कियारानं काम केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. याआधी कियाराऐवजी ‘स्टुडंट ऑफ दी इअर 2’ फेम तारा सुतारियाचं नाव चर्चेत होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun reddy hindi remake is out kabir singh
First published on: 26-10-2018 at 13:59 IST