scorecardresearch

‘आता आणखी सहन होत नाही’ म्हणत अरमान मलिकने डिलीट केले इन्स्टाग्रामचे सर्व पोस्ट

८० लाख फॉलोअर्सना बसला आश्चर्याचा धक्का

armaan malik
अरमान मलिक

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरमान मलिकने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्रामवरील ८० लाख फॉलोअर्सना आश्चर्याचा धक्काच दिला. अरमानने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले व डिस्प्ले पिक्चरवर (डीपी) काळी इमेज ठेवली. अरमानला अचानक काय झालं असा प्रश्न पडला असतानाच त्याने एक नवीन मेसेज पोस्ट केला. ‘आता मला आणखी सहन नाही होत’, असं त्यावर लिहिलंय.

अरमान इन्स्टाग्रामवर सक्रिय होता. मग अचानक त्याने असा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांना पडला. अनेकांनी त्याला कमेंटमध्ये प्रश्न विचारले. मात्र नेमकं काय झालंय हे कोणालाच अद्याप कळू शकलं नाही. अरमानचा अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाजही काहींनी वर्तवला आहे.

https://www.instagram.com/p/B9kDcgPJyn_/

इन्स्टाग्रामवर सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर अरमानने ट्विटरवर लिहिलं, “वेळ सर्व गोष्टी उलगडणार, काळजी नसावी.” अरमानच्या या वागण्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये आणखी एक मेसेज लिहिला. ‘अंदाज वर्तवणं आणि सत्य माहित नसतानाही निष्कर्ष लावणं यामध्ये सर्वांत जास्त धोका आहे. वाट पाहा, तुम्हाला सर्वकाही लवकरच समजेल’, असं त्याने लिहिलं. त्यामुळे अरमानचा हा पब्लिसिटी स्टंट असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2020 at 11:09 IST
ताज्या बातम्या