‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाइल्ड कार्डच्या माध्यमातून आरोह वेलणकरची एण्ट्री झाली आहे. ‘रेगे’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या आरोहला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते फार खूश झाले आहेत. तोसुद्धा इतर सदस्यांसोबत रुळला आहे. ‘वूट’वरील अनसीन अनदेखा क्लिपमध्ये आरोह त्याची लव्हस्टोरी सांगताना दिसत आहे.

‘मी ज्या नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो त्यातच अंकिता कोरिओग्राफर होती. आमची मैत्री झाली. त्यावेळी मी इंजीनिअरिंग करत होतो, म्हणून असाइनमेंट पूर्ण करायला वेळ मिळायचा नाही. अशा वेळी अंकिता माझ्या मदतीला धावून यायची. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पण काही महिन्यांनी आमचं ब्रेकअप झालं.’

https://www.instagram.com/p/Bb8yuJUhpGA/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https://www.instagram.com/p/BsxHCmTAV3H/

आणखी वाचा : ३०० मुलींसोबत सेक्स केला हा ‘संजू’मधला डायलॉग चालतो का? – शाहिद कपूर  

हे ऐकून सर्वजण अचंबित झाले. आरोहने पुढे सांगितलं, ‘ब्रेकअपनंतर मला अंकिताचं खरं महत्त्व समजलं. ती दुसऱ्या मुलासोबत फिरायला गेली तरी मला खूप त्रास व्हायचा. अखेर मी पुन्हा तिच्याकडे गेलो आणि लग्नासाठी विचारलं.’