या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी कोंबडी की आधी अंडे?,  हा बॉलीवूडसमोरचा प्रश्न सध्या तरी काही सुटताना दिसत नाही आहे. डबघाईला आलेल्या चित्रपटगृह व्यवसायाला पुन्हा एकदा चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळाली होती. मात्र एखादा तरी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित व्हावा ही एकच आस घेऊन चित्रपटगृह व्यावसायिक अजूनही आपल्या व्यवसायाला आर्थिक उभारी कशी मिळेल?, या विवंचनेत आहेत. एकीकडे अनेक हिंदी चित्रपटांच्या एप्रिल-मे महिन्यातील तारखा जाहीर झाल्या आहेत, तरीही रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट आपल्याला या परिस्थितीतून लवकर बाहेर काढू शकेल, अशी सगळ्यांची अटकळ आहे. किमान २ एप्रिलला होळीच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल, ही त्यांची इच्छा पुन्हा एकदा धुळीला मिळाली आहे.

देशभरात चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू के ली होती. महाराष्ट्रात अद्याप ती परवानगी मिळालेली नसली तरी लवकरच तो निर्णय घेतला जाईल, अशी निर्मात्यांची अपेक्षा होती. टाळेबंदीनंतर प्रदर्शित होणारा हा बॉलीवूडमधील सगळ्यात मोठा चित्रपट ठरला असता खरा… पण प्रत्यक्षात चित्रपटाचे प्रदर्शन चर्चेच्या गुºहाळातच अडकू न पडले. चित्रपटगृह मालकांबरोबर नफ्यातील वाटा, चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतर आठवड्याभराच्या कालावधीने चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची परवानगी मिळावी अशा काही ठरावीक मुद्द्यांवर निर्माते आणि चित्रपटगृह व्यावसायिक यांच्यात गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू होती. मात्र चर्चेत कोणाचेही एकमत होईना… अखेर चर्चा संपण्याची वाट पाहता पाहता देशभरात करोनाने पुन्हा एकदा डोके  वर काढले आहे. के वळ मुंबई-महाराष्ट्रातच नाही तर देशभरात करोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या नव्या वादळाने निर्माते पुन्हा एकदा आपल्या निर्णयावरून मागे हटले आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने रात्रीची संचारबंदी, शोज रद्द करण्यासह आणखी काही निर्बंध नव्याने लागू होतील, याबद्दल कु जबुज सुरू झाली आहे. हीच परिस्थिती देशभरात अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीच्या वातावरणात ‘सूर्यवंशी’ सारखा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करून आर्थिक नुकसान ओढवून घेण्याच्या फं दात निर्माते पडणार नाहीत, हे स्पष्टच असल्याचे मत चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त के ली आहे. शिवाय, देशभरात मार्च अखेरपर्यंत सगळ्याच राज्यांमध्ये पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा अंदाज होता. आता हाही निर्णय पुढच्या काही महिन्यांत होणार नाही, हे लक्षात आल्याने ‘सूर्यवंशी’चे प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on sooryavanshi release date abn
First published on: 14-03-2021 at 00:02 IST