नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या ‘सोनी मराठी’वरील ‘भेटी लागी जीवा’ मालिकेत पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये ‘नायिकाप्रधान’ मालिकांची चलती असते. मात्र ‘भेटी लागी जीवा’ ही पहिली ‘पुरुषप्रधान’ मालिका असल्याचा दावा करण्यात येत आहे. या मालिकेतील तीन पिढय़ांच्या तीन प्रमुख पुरुष व्यक्तिरेखांभोवती मालिकेचे कथानक फिरते. नव्या विचारांच्या मालिका यायला हव्या, अशी अपेक्षा अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भेटी लागी जीवा’ मालिकेत ‘तात्या जंगम’ ही भूमिका साकारली आहे. भारुड, निरुपणाच्या माध्यमातून तो समाजाचे प्रबोधन करतो. प्रबोधन करताना अंधश्रद्धेचं निमूर्लन करायचं आणि पुराणातल्या गोष्टींचे दाखले देताना  विनोदनिर्मितीही होईल याचं भान या व्यक्तिरेखेला आहे. मनोरंजन आणि प्रबोधन हे या मालिकेचं मूळ सूत्र आहे. या ‘तात्या जंगम’च्या कुटुंबात त्यांची पत्नी, भाऊ , मानलेला मुलगा आहेत. त्यांचा एक मुलगा लहानपणीच घर सोडून निघून गेला असून तो घरी परत आलेला नाही. माणसांच्या मनाचा आणि वृत्तीचा शोध या मालिकेतून घेतला असल्याचे नलावडे म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun nalawade bheti lage jiva live sony marathi
First published on: 28-10-2018 at 02:48 IST