आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून प्रेक्षकांना विठ्ठलाचं दर्शन घरबसल्या घेता येतं. आषाढी एकादशीला प्रसारित होणाऱ्या विठुमाऊलीच्या विशेष भागात पुंडलिक आणि विठ्ठलाच्या भक्तीचा नयनरम्य सोहळा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

पुंडलिकाने १२ बलुतेदारांच्या मदतीने बांधलेलं मंदिर पूर्णत्वास गेलं आहे. कलीयुगातलं सर्वश्रेष्ठ मंदिर पुंडलिकाने उभं केलंय. तिन्ही लोकांत ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली गेली तो क्षण अखेर जवळ आला आहे. या मंदिरात विठ्ठल – रुक्मिणीने प्रवेश करावी अशी पुंडलिकाची इच्छा आहे. विठ्ठलाची साथ २८ युगं अखंड सोबत राहावी म्हणून रिंगण सोहळाही पार पडणार आहे. वारीमध्ये पवित्र मानला जाणारा रिंगणसोहळा मालिकेमधून अनुभवायला मिळणं म्हणजे दुग्दशर्करा योगच म्हणावा लागेल. तमाम भक्तांना ‘विठुमाऊली’ मालिकेच्या आषाढी विशेष भागात हा नयनरम्य सोहळा पाहायला मिळेल. पुंडलिकाच्या इच्छेखातर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणार का? विठुराया कलीचा विनाश कसा करणार? याची गोष्ट आषाढी एकादशीच्या विशेष भागात पहाता येईल.

sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

‘विठुमाऊली’ मालिकेत वारी आणि रिंगण सोहळा पार पडणार आहे तर ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. श्री दत्तजन्म सोहळा याची देहि याचि डोळा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दत्तगुरुंच्या जन्माच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पण दत्तजन्म नेमका कसा झाला? याची उत्कंठावर्धक कथा ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या विशेष भागातून उलगडेल.