अशोक सराफ आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा लहानपणीचा किस्सा अनेकांना माहित नसेल. किंबहुना ही दोन नावं एकत्र ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. लहानपणीचे दिवस, चिखलवाडी आणि सुनील गावस्कर यासंदर्भात अशोक सराफ यांनी काही मजेदार किस्से ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’दरम्यान सांगितले.

सुनील गावस्कर यांच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अशोक सराफ म्हणाले की, ‘सुनील ज्या इमारतीत राहत होता तो संघ आणि माझ्या इमारतीतील संघ यांमध्ये दर रविवारी क्रिकेटचा सामना रंगायचा. त्याच्यासोबत आम्हीही खेळायचो. खरं तर आम्ही खेळायचो म्हणजे आम्ही नुसते तिथे असायचो, केवळ तोच काय तो क्रिकेट खेळायचा. त्याने बॉल मारला की तो आणायला आम्ही पळत जायचो. तो मारत सुटायचा. त्यावेळीसुद्धा त्याला बाद करणं ही खूप कठीण गोष्ट होती. तेव्हा तो केवळ ८-१० वर्षांचा होता. त्याच्या खेळण्याची, उभं राहण्याची स्टाईल हे आम्ही नुसते बघत बसायचो.’

Kohli Daughter Enjoying Swinging The Bat
विराटची लेक बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट खेळणार? कोहली मुलाखतीत म्हणाला – “तिला बॅट स्विंग करायला…”
LSG Head Coach Justin Langer On KL Rahul- Goenka Controversy
“धोनीने पैसे कमावले म्हणून..” , IPL व खेळाडूंच्या ‘इगो’बाबत LSG च्या प्रशिक्षकांचं थेट उत्तर; म्हणाले, “रोहित – कोहली..”
a couple mentioned 15 rules in wedding card for guest
“लग्न आमचे आहे, तुमचे नाही” लग्नाच्या पत्रिकेत लिहिले पाहूण्यांसाठी १५ नियम, एकदा क्लिक करा अन् नीट बघा
loksatta analysis about coach contenders of the indian cricket team
विश्लेषण : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी दावेदार कोण? राहुल द्रविडच कायम की लक्ष्मण, नेहरा किंवा पाँटिंग? 
Wasim Akram Statement on Virat kohli Sunil Gavaskar spat over Strike rate
“पण विराटने असं म्हणायला नको होतं…” कोहली-गावसकरांच्या स्ट्राईक रेट मुद्द्यावर वसीम अक्रमच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Akash chopra False Statement goes viral on Rohit sharma Ex Cricketer slams with social media post
आकाश चोप्राच्या नावाने रोहित शर्माबद्दल पसरवली जात होती अफवा, माजी क्रिकेटर चांगलाच भडकला
viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

वाचा : मी चौकटचा नाही बदामचा राजा- अशोक सराफ

नंतर सुनील गावस्कर क्रिकेट क्षेत्राकडे वळले आणि अशोक सराफ नाटकाकडे. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. मात्र आजही त्या आठवणी ताज्या असल्याचे मामा सांगतात. सुनील गावस्कर आणि अशोक सराफ यांनी एकत्र नाटकातसुद्धा काम केलंय. हे ऐकून पुन्हा धक्का बसला ना? खरंय, लहानपणी दोघांनी ‘गुरूदक्षिणा’ या नाटकात काम केलं. हा किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले की, ‘सुनीलसुद्धा एक चांगला नट आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात त्याने भूमिकाही साकारली होती. ‘मालामाल’ या हिंदी चित्रपटातही तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. लहानपणी आम्ही एकत्र नाटकात काम केलेलं, रेडिओ प्ले एकत्र केलं. ‘गुरुदक्षिणा’ या नाटकात त्याने कृष्ण आणि मी बलरामाची भूमिका साकारली. या नाटकादरम्यानचा फोटो अजूनही त्याच्याकडे आहे.’