नोकरी मग ती खाजगी असो, सरकारी असो किंवा निमसरकारी असो प्रत्येक ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखणं, ‘वर्क लोड’ पायी घरच्यांकडे दुर्लक्ष करणं, ‘डेड लाईनचा’ स्ट्रेस हे सगळं आलंच! पण जे काम करतोय त्यात आवड, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची वृत्ती असेल तर मग येणारा प्रत्येक दिवस ‘शेंटिमेंटल’ वाटायला लागतो. असे पॅशनेट, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे शेंटिमेंटल पोलीस अनुभवायचे असतील तर मग नुकताच प्रदर्शित झालेला ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाचा ट्रेलर चुकवून चालणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : अजय देवगण पडद्यावर आणणार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

हवालदाराचा वेष अशोक यांच्यासाठी खरच खूप खास आहे. १९७५ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षानंतर ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटात देखील ते हवालदारच्या, किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या भूमिकेत येत आहेत. अशोक मामांचा अभिनय आणि संवाद शैलीतील ‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत तोड नाही. अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई. सी. एम. पिक्चर्सद्वारे निर्मित, आर. आर. पी. कॉर्पोरेशन, बनी डालमिया प्रस्तुत आणि समीर पाटील लिखित दिग्दर्शित ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटामध्ये पोलिसांमधील ‘शेंटिमेंटल’ माणसाचे चित्रण खुमासदार पद्धतीने करण्यात आले आहे.

वाचा : संजूबाबाच्या बायोपिकच्या निमित्ताने सोनम- अनुष्काचा ‘सेल्फी’श क्षण

अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुबीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf upendra limaye shentimental trailer
First published on: 20-07-2017 at 10:19 IST