सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापली काळजी घेत आहे. संपर्कातून पसरणारा हा संसर्गजन्य आजार थांबवण्यासाठी शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच अनेकांना घरुन काम करण्यास सांगितले जात आहे. अशातच आपले आवडते कलाकार काय करतात हे जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. नुकताच अश्विनी भावे यांनी सध्याच्या परिस्थित त्या काय करत आहेत हे सांगितले आहे.
अश्विनी भावे या कॅलिफोर्नियामध्ये राहत आहेत आणि तेथे ‘शेल्टर इन प्लेस’ अशी ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे आयत्या हातात आलेल्या वेळात एक तर वाचन, दुसरं स्वयंपाक बनवणं आणि महत्वाचं म्हणजे बागकाम त्या करत आहेत.
करोना व्हायरचा चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. तर काही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच अनेक नटकांचे परदेशी दौरे रद्द करण्यात आले आहे.