बॉलीवूडमधील दाक्षिणात्य सुंदरी असीन लवकरच मायक्रोमॅक्स कंपनीचा सह-संस्थापक राहुल शर्मासोबत विवाहबद्ध होणार आहे. नवी दिल्लीत येत्या २३ जानेवारी रोजी असीन-राहुलचा विवाह सोहळा होणार आहे. सध्या दोघांची लग्नपत्रिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे. नवविवाहीत जोडपे क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि गीता बसराच्या लग्नपत्रिकेचे डिझाईन तयार केलेल्या कंपनीनेच असीन-राहुलच्या लग्नपत्रिकेचे डिझाईन तयार केले आहे. लग्नपत्रिकेचे स्वरुप, डिझाईन, रंग या सर्व गोष्टी खुद्द असीन आणि राहुल यांनी निवडल्या आहेत.
दिल्लीत विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर मुंबईत ‘ग्रँड रिसेप्शन’ ठेवण्यात येणार आहे. रिसेप्शनला बॉलीवूड मंडळींसह विविध क्षेत्रातीन मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asin and rahul sharma wedding card
First published on: 31-12-2015 at 15:54 IST