कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवत आहेत. या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळत आहे.

कलर्स मराठी या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक्रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली होती. याच पहिल्यावहिल्या पर्वाची पहिली विजेती मेघा धाडे, तसेच उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, सई लोकूर, स्मिता गोंदकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये बिग बॉसच्या या बिनधास्त सदस्यांनी पहिल्यांदाच बेधडक खुलासे केले आहेत. अस्सल पाहुणे इरसाल नमुने याचा बिग बॉस मराठी महिला विशेष भाग या आठवड्यामध्ये गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

कार्यक्रमामध्ये गप्पा आणि गोष्टीबरोबर अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले ज्याची उत्तर यांनी दिली आहेत. जसे मेघा धाडेला मकरंद यांनी विचारले कि तू बिग बॉसच्या वेळेस मत Manage केले होते ? हे खरे आहे का ? तसेच उषा नाडकर्णी यांना विचारले तुमच्या फटकळ स्वभावाने बरेच दुखावले जात असतील तुम्हाला हे मान्य आहे का ? सईला बिग बॉसच्या प्रवासामध्ये कोणा ना कोणाची तरी साथ वा आधार लागला त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकली असं प्रेक्षकांना वाटत होत… असं का घडलं ? बिग बॉस मध्ये टिकून राहण्यासाठी बिकीनिचा आधार स्मिता तुला का घ्यावासा वाटला ? याबद्दल काय सांगशील ? या प्रश्नांची उत्तरं हे सदस्य काय देतील ? काय सांगतील ? हे तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे.