दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या चित्रपटात आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘नॉन कुल मुदित शर्मा’ आणि ‘नॉन हॉट सुगंधा जोशी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
छोट्या शहरांमधील रोमान्स, मनोरंजनाचा देसी अंदाज हे आनंद एल राय यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्य ‘शुभ मंगल सावधान’च्या ट्रेलरमधून पाहायला मिळतं. यामध्ये वजन घटवलेल्या भूमीचा नवीन लूक आणि आयुषमान पुन्हा एकदा देसी अंदाजात दिसतोय. मध्यमवर्गीय कुटुंबातील या दोघांची लव्ह स्टोरी आणि लग्नाला येणाऱ्या अडचणी याचे चित्रण ट्रेलरमध्ये करण्यात आले. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर आयुषमान आणि भूमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. ‘सुगंधा, सबको पता चल गयी है अपनी स्टोरी,’ असं कॅप्शन आयुषमानने दिलंय. तर भूमीनेही, ‘मै और मुदित आ गए है इस शुभ घडी मे, सब सावधान रहना, बहुत ही मंगल होने वाला है,’ असं कॅप्शन देत ट्रेलर पोस्ट केलाय.
https://twitter.com/ayushmannk/status/892308237017546752
https://twitter.com/psbhumi/status/892307471720525825
वाचा : जेव्हा बाजूलाच बसलेल्या जेआरडी टाटांना ओळखू शकले नाही दिलीप कुमार…
आयुषमान आणि भूमी या चित्रपटातून दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांच्या ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे ‘शुभ मंगल सावधान’च्या ट्रेलरमध्येही दोघांमधील केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेतेय. हा तमिळ चित्रपट ‘कल्याण समयाल साधम’चा रिमेक असून सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.