दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारा आयुषमान अनेकदा त्याच्या जीवनात घडणाऱ्या लहान-लहान गोष्टीदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या पत्नीसाठी म्हणजे ताहिरासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताहिरा आणि आयुषमान यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाल्यामुळे आयुषमानने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ताहिरासोबतचा एक फोटो शेअर केला असून तिच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.


“१२५ वर्ष अशी एकमेकांची साथ देत. कदाचित अजून अनेक वर्ष. गेल्या अनेक काळापासून, वर्षापासून मी तुला ओळतोय आणि हे सारं मी शब्दांत मांडू शकत नाही. हे नातं केवळ एका जन्मापूरतं नाही. तू माझी सोबती, प्रेयसी, माझी विनोदवीर, माझी मार्गदर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. तुझ्यासोबत अशीच अनेक वर्ष सोबत रहायला आवडेल. हे खरंच फार रंजक असेल. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, अशी पोस्ट आयुषमानने शेअर केली आहे.

दरम्यान, कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून आयुषमान-ताहिराकडे पाहिलं जातं. कॉलेजजीवनापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीने २ वर्ष डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला आता १२ वर्ष उलटून गेली असून त्यांना विराजवीर आणि वरुष्का ही दोन मुलंदेखील आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana and tahira kashyaps anniversary post dcp
First published on: 01-11-2020 at 16:31 IST