हल्ली चित्रपटकर्ते चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नवनवीन कल्पना अमलात आणताना दिसतात. बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना ‘बेवकुफियां’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी आज (शुक्रवार) दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर गाताना आणि नृत्य सादर करताना दृष्टीस पडेल. मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील एका प्रसिद्ध रेस्तरॉंच्या बाहेर आयुषमान खुराना फ्लॅश मॉब प्रकारातील नृत्य सादर करणार असल्याचे सुत्रांकडन समजते. मुंबईतील हा परिसर चित्रपटातील वातावरणाशी मिळताजुळता असल्याने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या परिसराची निवड करण्यात आल्याचे देखील त्यांच्याकडून समजले. ‘बेवकुफियां’ चित्रपटात आयुषमान खुराना एका मोठ्या कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे, ज्याला कामावरून काढण्यात आले आहे. यामुळे चित्रपटकर्त्यांनी मुंबईतील या कॉर्पोरेट परिसरातच चित्रपटाचा प्रसिद्धी कार्यक्रम करण्याचे निश्चित केले. चित्रपटात आयुषमान खुराना सोनम कपूरबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. यश राज फिल्मस् निर्मित ‘बेवकुफियां’ चित्रपट १४ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
आयुषमान खुराना मुंबईच्या रस्त्यांवर करणार परफॉर्म!
हल्ली चित्रपटकर्ते चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नवनवीन कल्पना अमलात आणताना दिसतात. बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना 'बेवकुफियां' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी...

First published on: 07-03-2014 at 03:32 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसोनम कपूरSonam Kapoorहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana to perform on mumbai streets