पाहाः श्रद्धा आणि टायगर श्रॉफच्या ‘बागी’चा ट्रेलर

टायगरने केलेले अॅक्शन सीन्स नक्कीच कौतुकास्पद आहेत.

तब्बल दोन वर्षांनंतर टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या आगामी ‘बागी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
रोमान्स, अॅक्शन सीन्सने परिपूर्ण असा हा ‘बागी’ चित्रपटाचा ट्रेलर आहे. ट्रेलर पाहता टायगरचे विशेष कौतुक करावेसे वाटते. त्याने केलेले अॅक्शन सीन्स नक्कीच कौतुकास्पद आहेत. या चित्रपटासाठी त्याने कलारीपयटूचे(मार्शल आर्टचा एक प्रकार) प्रशिक्षणही घेतलेय. यामध्ये श्रद्धाही अॅक्शन करताना दिसते. तसेच, श्रद्धाने पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे बिकनीवर बोल्ड सीन्स दिले आहेत.
शब्बीरबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट आपल्या प्रेमासाठी लढा देणा-या हिरोवर आधारित आहे. ‘बागीः रिबेल्स इन लव’ हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Baaghi trailer shraddha kapoor tiger shroffs rebellious avatar is impressive

ताज्या बातम्या