अखेर, बाहुबलीने कटप्पाला का मारले ? या प्रश्नाचे उत्तर आज अनेक प्रेक्षकांना कळले असेल. गेल्या कित्येक दिवसांपासून ‘बाहुबली २’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत होती. या चित्रपटाच्या तिकीटांची विक्री सध्या जोरदार सुरु असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये आता हाऊसफुल्लचे बोर्ड लागल्याचे पाहायला मिळतेय. सर्वात मोठे ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या बुकमायशो आणि पेटीएमने एसएस राजामौलीच्या या चित्रपटाच्या तिकीटांवर खास डिस्काऊंट दिला आहे. बुकमायशोवरून दोन तिकीटं बुक केल्यावर तुम्हाला तब्बल १२५ रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला BMS125 हा प्रोमो कोड वापरावा लागेल. तर पेटीएम युजर्सना दोन तिकीट बुक केल्यावर १०० रुपये कॅशबॅकअंतर्गत मिळू शकतात. यासाठी युजर्सना BAAHUBALI हा प्रोमोकोड वापरावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आणि एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ला २०१५ साली बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाले होते. या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘बाहुबली : द कन्क्लूजन’च्या अॅडव्हान्स बुकिंगला अगदी दमदार सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यावर केवळ २४ तासांमध्ये चित्रपटाची दहा लाख तिकीटं विकली गेली. या चित्रपटाने डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या आमिरच्या ‘दंगल’चाही विक्रम मोडला आहे.

‘बाहुबली : द कन्क्लूजन’ चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम या चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. जगभरात जवळपास ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून सर्वाधिक कमाईची अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, फर्स्ट डे फर्स्ट शोला गेलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे. मात्र, समीक्षकांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baahubali 2 here is how you can get discounts on tickets from bookmyshow paytm
First published on: 28-04-2017 at 16:36 IST